Sanatan Audio Books

Sanatan Audio Books




Shri Datta Mahaatmya Audio Book (Marathi)



प.पु. श्री सद्गुरू श्री वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराजांनी सर्वा पुराणातील सार काढून श्रीदत्त पुराण या ग्रंथाची संस्कृत भाषेमध्ये रचना केली असून त्याची ज्ञान, कर्म व उपासना हि कांडे आहेत. कालमानानुसार समाजातील संस्कृतचे कमी ज्ञान होऊ लागल्याने शके १८२३ मध्ये (सन १९०१) त्यांनी श्री दत्त पुराणातील उपासना कांडावर 'श्री दत्त महात्म्य' हा प्राकृत ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे एकावन्न अध्याय असून पाच हजार चारशे ओव्या आहेत. श्री महाराजांनी यांत औपनिषद ज्ञान सांगितले असून ग्रंथात मुख्यत्वे नवविधा भक्ती, सहस्त्रार्जुन, अलर्क, आयु व यदु या चार भक्तांची चरित्रे व तत्वज्ञान यांचा समावेश आहे. शेवटच्या अध्यायात श्रीमहाराजांनी श्रीदत्तात्रेयांची प्रार्थना केली आहे कि या ग्रंथात प्रभूंनी सतत सान्निध्य ठेवावे.या ग्रंथाची पारायणे भाविक श्री गुरुचरित्र या ग्रंथा प्रमाणे नित्य करत असतात. अशा या प्रासादिक ग्रंथाचे हे गद्य रुपांतरीत वाचन आहे. 
Download Datta Mahatmya audio here
 

No comments:

Post a Comment